अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ , पंतप्रधानांकडून घोषणा

नवी दिल्‍ली : रायगड माझा ऑनलाईन

Image result for narendra modi

देशातील अंगणवाडी कर्मचार्‍यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. सर्व अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

अंगणवाडी कर्मचार्‍यांना आतापर्यंत ३ हजार रुपये मानधन मिळत होते त्यांना आता ४ हजार ५०० रूपये मिळणार आहे. त्या प्रमाणे ज्या कर्मचार्‍यांना २ हजार २०० ज्यांना मानधन आहे त्यांना ३ हजार ५०० रुपये मानधन झाले आहे. अंगणवाडी मदतनींसासाठीही खूशखबर देऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मतदनीसांच्या पंधराशे रूपयांवरून त्यांना २ हजार २२५ रूपये मानधन वाढवण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत