अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सिद्धीविनायकाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री १२ वाजता सिद्धीविनायकाची विशेष महापूजा करण्यात आली. चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष स्थान असून या दिवशी भक्तांकडून गणपतीची मनोभावे पूजा केली जाते, त्यामुळे आज सकाळपासूनच येथे भक्तांची रीघ पाहायला मिळत आहे. रात्री पुजा झाल्यानंतर सकाळी साडेसातपर्यंत जवळपास दोन लाख भाविकांनी येथे दर्शन घेतल्याची माहिती आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आल्याचे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

 

दर्शनाची वेळ-

 • सोमवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत
 • मंगळवारी पहाटे ३.५० ते रात्री ८ वाजेपर्यंत
 • रात्री ९.५० ते रात्री १२ वाजेपर्यंत

अशी असेल सुविधा-

 • पुरुष, महिला आणि अपंग व गर्भवतींसाठी वेगळ्या रांगा असतील.
 • दत्ता राऊळ मार्गाकडून महिलांची रांग असेल तर रविंद्र नाट्य मंदिराच्या बाजूने पुरुषांची रांग असेल.
 • मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून रिद्धी प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल.
 • मंदिर परिसरात भाविकांसाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार असून अॅम्ब्युलन्सचीही सुविधा करण्यात येणार आहे.
 • पिण्याचे पाणी, चहा, मोबाईल टॉयलेट यांसारख्या व्यवस्थाही मंडपात करण्यात येणार आहेत.
 • प्रभादेवी स्थानकापासून भाविकांना सिद्धिविनायक मंदिरापर्यंत येण्यासाठी मोफत बसेसची सुविधा करण्यात आली आहे. या बसेस सोमवारी रात्री १२ पासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत सुरु असतील.

आरती

 • पहाटे १२.१० ते १.३० काकड आरती व महापूजा असेल.
 • पहाटे ३.१५ ते ३.५० आरती
 • रात्री ८.१५ ते ९.५० महापूजा, नैवेद्य व आरती

ही काळजी घ्या

 • मंदिरात दर्शनासाठी येताना इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच मौल्यवान वस्तू आणू नका.
 • रांगेतून सर्वांना दर्शन मिळणार असल्याने कोणीही धक्काबुक्की करु नये.
 • जे नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनाने येतील त्यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंदिरापासून दूर अंतरावर आपली वाहने लावण्याची व्यवस्था करावी असे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.