अंगावर 591 टॅटू गोंदवून शहीद जवानांना आदरांजली

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for abhishek gautam

देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढून देशवासीयांना सुरक्षिततेची हमी देणाऱया सैनिकांबद्दल नागरिकांच्या मनात कायम आदराचे स्थान असते. पण दिल्लीच्या एका तरुणाने कारगील युद्धातील शहीदांना आदरांजली वाहण्याचे ठरविले आणि स्वतःच्या शरीरावर तब्बल 591 टॅटू गोंदले. कारगील युद्धात वीरमरण आलेल्या 559 सैनिकांची नावे तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांची रेखाचित्रे असे हे 591 टॅटू आहेत.

अभिषेक गौतम असे या 30 वर्षीय तरुणाचे नाव असून व्यवसायाने तो इंटिरिअर डिझायनर आहे. अंगभर टॅटू गोंदण्यासाठी त्याला तब्बल आठ दिवस लागले. येत्या जूनपासून अभिषेक त्याच्या बाईकवरून देशभर तब्बल 15 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या प्रवासात प्रत्येक दिवशी एका शहीदाच्या कुटुंबीयांना भेटण्याची त्याची योजना आहे. 24 ते 26 जुलै यादरम्यान तो कारगील युद्ध दिनानिमित्त द्रास क्षेत्रात उपस्थित राहणार आहे.

कश्मीरमधील पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात देश सहभागी झाला आहे. या हल्ल्याबाबत बोलताना अभिषेक म्हणाला, ‘मला ठावूक आहे की अनेकांना युद्ध हवे आहे, पण युद्ध हा उपाय नव्हे. खूप लोक युद्धात मारले जातील.’

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत