अंधेरीत पेनसुला इमारतीला आग, 40 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश

मुंबई : महाराष्ट्र News 24

देसाई रोडवरील पेनसुला इमारतीला ही आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अंधेरीत वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या बहुमजली इमारतीला आग लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चाळीस जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. इमारतीत काहीजण अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  इमारत १७ मजली असून एसीमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

अंधेरीत बहुमजली इमारतीला आग, बचावकार्य सुरू

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत