अंधेरी उड्डाणपूलावर भीषण अपघात; ८ जण गंभीर जखमी

अंधेरी: रायगड माझा वृत्त

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. सायनमध्येही रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईत अंधेरी उड्डाणपूलावर बुधवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. तीन कार परस्परांवर आदळल्या. सायन-माटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झालं असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.  मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे हा अपघात घडला.

 

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत