अंनिसचे आज जबाब दो आंदोलन

सुत्रधारांना अटक करण्याची मागणी

सातारा: रायगड माझा

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असली तरी तपास यंत्रणेने मुळाशी जावून सुत्रधारांना अटक केली पाहिजे, या मागणीसाठी अंनिस सोमवार दि.20 ऑगस्ट रोजी साताऱ्यात जबाब दो आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रशांत पोतदार यांनी सांगितले.

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला सोमवार दि.20 ऑगस्ट रोजी 5 वर्ष पूर्ण होत आहेत. पाच वर्षाच्या कालावधीत केवळ विरेंद्र तावडे या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी आणखी दोघांना अटक करण्यात आली. मात्र, गेली चार वर्ष अंनिसच्यावतीने दि.20 ऑगस्ट रोजी जबाब दो हे आंदोलन करण्यात येत असून मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असली तरी तपास यंत्रणेने मुळापर्यंत सुत्रधारांना अटक करावी या मागणीसाठी साताऱ्यात आंदोलन, रॅली तसेच अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 20 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते सयाजीराव विद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अभिवादनपर रॅली काढण्यात येणार आहे. तदनंतर 11 ते 1 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून जिजामाता विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 4 वाजता राजवाडा परिसरात मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शन होणार असून सांयकाळी 6 वाजता पाठक हॉल, सातारा येथे जयदेव डोळे हे मागदर्शनपर अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पोतदार यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत