रायगड माझा वृत्त:मुंबई
अकरावी प्रवेशाची आज ११ वाजता जाहीर होणारी यादी अचानक पुढे ढकलली आहे. आता ही यादी १९ जुलै रोजी ११ वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यादी पुढे ढकलण्याचे तांत्रिक कारण पुढे केले आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश राज्यात सुरू आहेत. 5 जुलै रोजी पहिली यादी जाहीर झाली, त्यानंतर पावसामुळे दोन दिवस प्रवेश लांबल्याने दुसऱ्या यादीचे वेळापत्रक पुढे ढकलले. सोमवारी जाहीर होणारी यादी अचानकपणे पुढे ढकलली आहे.
शेयर करा