अकराव्या मजल्यावरून पडून कामगार महिलेचा मृत्यू.

अपघात नसून घातपात असल्याचा घरांच्याचा आरोप.

पुणे : रायगड माझा

अकराव्या मजल्यावरून सफाई कामगार  महिला पडून मृत झाल्याची घटना सोमेश्वरवाडी पाषाण  येथिल शिवरंजन टाॅवर इमारतीत आज सकाळी घडली .राधा शाबा भडकवाड (वय 28 वर्षे रा. इंदिरा गांधी वसाहत,औंध)  असे महिलेचे नाव असून ती एका खाजगी कंत्राटदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करत होती.

अकराव्या मजल्यावरील जीन्याजवळ साफसफाई करत असताना ती  खाली पडली डोक्याला व चेह-याकडील भागाला जोराचा मार लागल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. तर जीन्यावळ काम करतांना ती  पोर्चमधून खाली पडल्याची माहिती कंत्राटदार बापू गायकवाड यांनी दिली.मयत राधाच्या हाताला दोरी बांधलेली होती व खाली पडल्यानंतरही हाताला गुंडाळलेली असल्याने या घटनेत तिचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.तर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत दोरी हाताला नसून जमिनीवर आधीच पडलेली होती व राधा नेमकी दोरीजवळ पडल्याने गैरसमज झाल्याचे सांगितले. तिच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने रात्रभर थकलेली राधा सकाळी कामावर जायला तयार नव्हती परंतु कंत्राटदाराने जबरदस्तीने कामावर बोलावून घेतल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले. मृत राधा हि घरात एकटीच कमावणारी आहे पतीला दारूचे व्यसन असल्याने घरातील सर्व जबाबदारी तिच्यावर होती.तिच्या पश्चात पती, अकरा वर्षाची  मुलगी, अनुक्रमे आठ व सहा वर्षाची दोन मुले  असून आईचे छत्र हरपल्याने  मुले पोरकी झाली आहेत. आई गेल्याची जाणिवही या मुलांना नव्हती एवढी ती मुले अजाण आहेत.आईच्या मृत्यूनंतर मुलांना वडिलांचाही आधार मिळणे अशक्य असल्याने त्यांच्या भविष्याची जबाबदारी कंत्राटदाराने घ्यावी अशी मागणी शेजारी,नातेवाईक व घरच्यांनी  केली आहे.जोपर्यंत  आम्हाला मुलांच्या भविष्याची घ जबाबदारी घेण्याबद्दल लेखी स्वरूपात आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत  प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घरच्यांनी घेतला होता.राधाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच मुलांच्या भविष्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन द्यावे

आईच्या मृत्यूनंतर मुलांना वडिलांचाही आधार मिळणे अशक्य असल्याने त्यांच्या भविष्याची जबाबदारी कंत्राटदाराने घ्यावी अशी मागणी शेजारी,नातेवाईक व घरच्यांनी  केली आहे.जोपर्यंत  आम्हाला मुलांच्या भविष्याची घ जबाबदारी घेण्याबद्दल लेखी स्वरूपात आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत  प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घरच्यांनी घेतला होता.अशी मागणी घरच्यांनी केली

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत