अकुर्डीतील ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने बारणे यांना मिळाले नवे बळ

आकुर्डीत खासदार बारणे यांचा भेटीगाठी दौरा

पिंपरी : रायगड माझा वृत्त
सर्वसामान्यांचे प्रश्न देशाच्या संसदेत मांडणारे, त्यांच्या न्यायहक्कासाठी अहोरात्र झटणारे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून येतील, असा विश्वास आणि आशीर्वाद ज्येष्ठ नागरिकांनी दिला. त्यामुळे बारणे यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
गुरुवारी (दि. 28) शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आकुर्डी परिसरात भेटीगाठी दौरा केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाला खासदार बारणे यांनी भेट दिली. त्यावेळी ज्येष्ठांनी त्यांना पुन्हा एकदा विजयी होण्याचा आशीर्वाद दिला.
आकुर्डी येथील भेटीगाठी दौऱ्यात सल्लागार मधुकर बाबर, आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, पिंपरी चिंचवड शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, उपविभाग संघटिका शैला पाचपुते, विभाग प्रमुख शैला निकम, सुभाष जैन, ज्येष्ठ नागरिक उत्तम कुटे, हभप किसन महाराज चौधरी, किसन देशमुख, बाळकृष्ण गायकवाड, जयंतीलाल मेहता, कपूरचंद सोलंकी, रणजित सोलंकी, जयंतीलाल राठोड, गौतम जगताप, संपत जगताप, प्रमोद शेरे, सुहास जगताप, रोशन जगताप, बाजीराव आल्हाट, प्रमिला जगताप, सुभाष जगताप, सचिन भोसले, वसंत साने, संतोष सावंत, चंद्रकांत कोकाटे, सातपुते, रवींद्र कोंढारे, पंडित देशमुख आदी उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी दौ-याच्या सुरुवातीला आकुर्डी मधील श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर, द्वारकामाई साईबाबा मंदिरांमध्ये दर्शन घेतले. आकुर्डीगावातील विश्वरत्न बौद्ध विहाराला भेट देऊन तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. श्री खंडेराया भाजी मंडईमधील भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला.
साईपूजा बाग फेज एक-दोन, निरुपम हाऊसिंग सोसायटी, सीता रेसिडेन्सी आदी सोसायट्यांना भेटी दिल्या. राजू सांकला, अभय इनामदार, नगरसेविका चारुशीला कुटे, संभाजी सूर्यवंशी, विठ्ठल काळभोर, राष्ट्रीय खेळाडू पप्पू काळभोर, गोरख भालेकर, उत्तम काळभोर आदींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान खासदार बारणे यांनी आकुर्डी मधील शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाला भेट दिली.
शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तम कुटे म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे हे क्रियाशील खासदार आहेत. सर्व स्तरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपल्या कामातून जनमानसात आपला ठसा उमटवला आहे. ते व्यक्ती म्हणून उत्तम आहेत. त्यांच्याशी कधीही संपर्क करता येतो. त्यामुळे असा जनमानसात मिळून मिसळून काम करणाराच खासदार असायला हवा. येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे हेच विजयी होतील असा आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आत्मविश्वास आहे. आमचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी आहे.”
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी विरोधकांचे संपूर्ण कुटुंब शहरात ठाण मांडून बसले आहे. विरोधकांच्या कुटुंबातील सदस्य, पक्षातील मंडळी भेटीला येतील. निवडणूक होईपर्यंत सर्वजण सहज भेटतील. पण एकदा निवडून आले तर पुन्हा त्यांना आपल्याला शोधावे लागेल. घरातील माणूस, सहज उपलब्ध होणारा उमेदवार म्हणजे महायुतीचा उमेदवार आहे. नागरिकांच्या अडचणींच्या काळात हा महायुतीचाच उमेदवार धावून येणार आहे. त्यामुळे आपले बहुमूल्य मत नागरिकांनी घरातल्या माणसाला द्यायचं की बाहेरच्या हा विचार करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला मावळ मतदार संघातल्या नागरिकांची मते चालतात, पण इथला स्थानिक उमेदवार मात्र चालत नाही. कारण इतरांना मोठं होऊ द्यायचं नाही, हे राष्ट्रवादीचे चुकीचे धोरण आहे. अशा भ्रष्ट मंडळींनी आजवर भ्रष्टाचार करून लुटलेला माल आता बाहेर काढण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता योग्य विचार करावा, असे आवाहन देखील खासदार बारणे यांनी केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत