अकोला शहरात उड्डाणपुलाच्या बांधकामाला तसेच मुख्य मार्गाच्या बांधकामाला सुरुवात

अकोला: रायगड माझा वृत्त

शहरातील नेकलेस रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहरू पार्क ते दुर्गा चौकपर्यंतचा मार्ग रुंद केला जात आहे. आधी अतिक्रमणामुळे या मार्गांचे बांधकाम थांबले, त्यानंतर पोल शिप्टिंगअभावी बांधकाम थांबले. आता कुठे हे कामदेखील पार पडले. त्यामुळे या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होत आहे.

Construction of two main routes simultaneously in Akola City | अकोला  शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम; अकोलेकरांची कोंडी

अकोला शहरात एकाच वेळी दोन मुख्य मार्गांवर बांधकाम सुरू झाल्याने अकोलेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अकोलेकरांची होत असलेली कोंडी थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन आधी एका मार्गाचे आणि त्यानंतर दुसºया मार्गाच्या बांधकामाला सुरुवात करायला हवी; मात्र त्याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याने दोन्ही मार्गावर बांधकाम सुरू झाले आहे. कौलखेड, सिंधी कॅम्प तसेच तुकाराम चौकाकडून रेल्वेस्थानकाकडे जाणाºयांना दुसरा कोणताही जवळचा पर्याय नाही.

एकीकडे या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होत आहे, तर दुसरीकडे जेल चौकापासून तर अग्रसेन चौकापर्यंत उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. दोन्ही मार्गावर अकोला शहरातील प्रमुख वाहतूक दररोज ये-जा करीत असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी भविष्यात अधिक जटिल झाल्याशिवाय राहणार नाही, असे एकंदरीत चित्र दिसत आहे. भविष्यातील धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने दखल घेत एक मार्ग सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे. अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी याच मार्गांचा वापर होतो. बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर जाण्यासाठीदेखील याच मार्गांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दोन्ही मार्गांचे बांधकाम एकाच वेळी सुरू झाल्याने आता अकोलेकरांची कोंडी होत आहे. महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाचा असमन्वय यास कारणीभूत ठरत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत