अक्षयकुमारच्या बंगल्यात चाहत्याची घुसखोरी

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

अभिनेता अक्षय कुमार यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चाहत्याला जुहू पोलिसांनी बुधवारी अटक केली. अंकित बिजेंद्र गोस्वामी असे या चाहत्याचे नाव असून तो मूळचा हरयाणाचा आहे.

अंकित हा सोमवारी अक्षय कुमार यांच्या जुहू परिसरातील बंगल्याजवळ आला. अक्षयकुमारला भेटायचे असल्याचे सांगत त्याने बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला सुरक्षारक्षकांनी बंगल्यात जाण्यास मज्जाव केला. तरीही त्याने आत शिरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून ठेवले आणि याबाबतची माहिती जुहू पोलिसांना दिली. घटनास्थळावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी अंकित हा मुंबईत आला. गुगलवर सर्च करत तो जुहू परिसरात पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत