अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ला पाकिस्तानात बंदी

हा सिनेमा मुस्लिम धर्मसमजुतींच्या विरोधात अाहे, असं पाकिस्तानात मत बनलं असल्यानं तो पाकिस्तानात रिलीज करायला तिथल्या सेन्सॉर बोर्डाने मज्जाव केलाय.

अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'ला पाकिस्तानात बंदी

12 फेब्रुवारी : पॅडमॅन या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संथ प्रतिसाद मिळालेला असला तरीही पाकिस्तानमध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकणार नाही. हा सिनेमा मुस्लिम धर्मसमजुतींच्या विरोधात अाहे, असं पाकिस्तानात मत बनलं असल्यानं तो पाकिस्तानात रिलीज करायला तिथल्या सेन्सॉर बोर्डाने मज्जाव केलाय. हा सिनेमा भारतासह पाकमध्येही रिलीज व्हावा यासाठी निर्मात्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

मात्र भारताच्या तुलनेत पाकिस्तानची संस्कृती बंदिस्त असल्याने हा सिनेमा संस्कृती ‘भ्रष्ट’ करण्याची शक्यता अाहे, असं वाटून तो रिलीज न करण्याचा निर्णय पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने घेतलाय.

पॅडमॅनमध्ये अक्षय कुमारच्या कामाचं प्रचंड कौतुक होतंय. गावागावातल्या महिलांमध्ये सॅनेटरी नॅपकिन्स वापरायची जागृती हा सिनेमा करतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत