अक्षय कुमारला एक ‘लाईक’ पडले महागात…

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात दिल्लीतील प्रतिष्ठीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थीही रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण अशाच एका व्हिडीओला लाईक करणे अक्षय कुमारला महाग पडले. अक्षयच्या लाईकचे प्रकरण इतके वाढले की, त्याला यावर खुलासा करावा लागला.

सोशल मीडियावर जामिया विद्यापीठ आंदोलनाचे अनेक व्हिडीओ व पोस्ट व्हायरल होत आहे. काही व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली तोडफोड दाखवली आहे तर काहींमध्ये पोलिसांची अमानुष मारहाण. अशाच एका व्हिडीओला अक्षयने लाईक केले. या व्हिडीओत आंदोलकांची पळापळ दिसतेय. झाले असे की, अक्षयने हा व्हिडीओ चुकून लाईक केला आणि त्याने लाईक केलेली पोस्ट क्षणात व्हायरल झाली.साहजिकच यानंतर अक्षयला ट्रोल करणे सुरु झाले. मग काय, अक्षयला त्याची चूक लक्षात आली. त्याने लगेच यावर खुलासा केला. ट्वीट स्क्रॉल करताना चुकून ही पोस्ट लाईक झाली. मी अशा कुठल्याही कृत्याचे समर्थन करत नाही. मी लगेच ही पोस्ट अनलाईक केली होती, असे खुलासा करताना त्याने लिहिले. अक्षयच्या या खुलाशानंतर काही लोकांनी त्याला पाठींबा दिला तर काहींनी याऊपरही त्याला ट्रोल केले. तुला खुलासा करण्याची गरज नाही सर, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, असे एका युजरने लिहिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत