अक्षय कुमार आणि करिना नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पद्यावर एकत्र

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अभिनेत्री करिना कपूर खान तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा ‘गुड न्यूज’ देणार आहे. पण करिना पुन्हा आई होणार नाहीए तर ती ‘गुड न्यूज’ नावाचा चित्रपट करणार आहे.बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि करिना नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पद्यावर एकत्र येणार आहेत. करण जौहर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता करणार आहेत.

चित्रपटाची कथा एका जोडप्याच्या अवती भवती फिरते. हे जोडपं अर्थात करिना आणि अक्षय. या दोघांना लग्नानंतर मूल जन्माला घालण्यासाठी लागलेली ओढ.. पण काही कारणांमुळं त्यांना मूल होत नाही. मूल होण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष आणि सामाजिक आणि मानसिक त्रास याचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अक्षय सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गोल्ड’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत