अक्षय कुमार :माझ्यासारख्या अभिनेत्यानं स्वत:च्या आयुष्यावरच जीवनपट काढला तर तो निव्वळ मूर्खपणा

मुंबई: रायगड माझा वृत्त 

बॉलिवूडमध्ये सध्या जीवनपटांचं पेव फुटलं आहे. प्रसिद्ध व्यक्तींवर एकामागोमाग एक चित्रपट बनू लागले आहेत. अशाच काही व्यक्तींच्या जीवनावर आधारित दर्जेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळतेय. मात्र, अभिनेता अक्षय कुमारनं स्वत:’च्या आयुष्यावर जीवनपट काढण्यात काहीच रस नसल्याचं म्हटलं आहे.

इतिहासात खूप चांगल्या कथा आहेत, तपन दास (गोल्ड चित्रपटात अक्षय साकारत असलेली भूमिका), अरुणाचलम मुरुगनंतम यांसारख्या लोकांचे कार्य खूप मोठे आहे. अशा व्यक्तींनी देशात अनेक सकारात्मक बदल घडवले, असं असताना माझ्या सारख्या अभिनेत्यानं स्वत:च्या आयुष्यावरच जीवनपट काढला तर तो निव्वळ मूर्खपणा ठरेल. स्वत:च्या आयुष्यावर एखादा चित्रपट काढावा असा विचारही माझ्या मनात येत नाही. माझ्या आयुष्यावर पुस्तकसुद्धा लिहिणार नाही. मी समाजातील रिअल म्हणजेच खऱ्या हिरोंच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करेन, पदड्यावरील रिल हिरोंवर नाही, असंही अक्षय म्हणाला.

‘सुपर ३०’, ‘मन्टो’, ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’, ऑलिम्पक चॅम्पियन ‘अभिनव बिंद्रा’ तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट यांसारखे जीवनपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत