अखिल म्हसळा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुका शाळा येथे शिक्षकसंघ वर्धापन दिन साजरा

म्हसळा : निकेश कोकचा
अखिल म्हसळा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुका शाळा येथे शिक्षकसंघ वर्धापन दिन कार्याध्यक्ष श्री संजय भाऊ म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अखिल रायगड प्राथ शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री किशोर मोहिते, हिशोब तपासणीस श्री कैलास कळस, तालुका सल्लागार श्री विद्यानंद वानखडे,सौ शुभदा दातार,श्री गोविंद चिकाटी,  उपसरचिटणीस प्रकाश मांडवकर, कोषाध्यक्ष श्रीम फरजाना सय्यद, प्रसिद्धी प्रमुख श्री राम रहाटे,  उपाध्यक्ष श्री विजय घाटगे, दिलीप पवार,चिटणीस राजू राठोड, रमेश जाधव,मच्छिंद्र खेमनार,महेश खोले, राहुल लव्हे, रमेश घाडगे,तीर्थकर व अन्य सभासद हजर होते.
सुरूवातीला सभासदांचे मयत नातेवाईक यांना श्रद्धांजली अर्पण करणेत आली. तसेच शिक्षकसंघ वर्धापन दिना विषयी श्री वानखडे, राजू राठोड, व किशोर मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये संघटनेचा इतिहास सांगताना आपली संघटना 7 जानेवारी 1954 रोजी नागपूर येथे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत  आचार्य मो.वा. दोंदे यांचे अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे. आचार्य दादासाहेब दोंदे यांचे नंतर संघटनेचे नेतृत्व भाईसाहेब दोंदे यांनी स्विकारल्या नंतर 1982 ला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जागतिक शिक्षक संघास संलग्न झाला. संपूर्ण जगात 167 देशात त्याचे काम चालते. भाईसाहेबांचे निधनानंतर या महाराष्ट्राचे नेतृत्व सुलभाताई दोंदे या करीत आहेत. त्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच सार्क शिक्षक संघाच्या कोषाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण यात शिक्षकांविषयी तरतुदी, शिक्षणाच खाजगीकरण, 2005 नंतरच्या शिक्षकांना जूनी पेन्शन योजना यासाठी आपली संघटना भारतीय स्तरावर लढत आहे.शिक्षक आणी विद्यार्थी गुणवत्तेसाठी नवनवीन प्रशिक्षणाचे आयोजन संघटनेचे खर्चातून करण्यात येते.
संघटना आपल्या पाठीशी असते फक्त आपण एकनिष्ठ राहून काम करत राहिले पाहिजे. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपण आपल्या संघटनेचे सोबत सदैव रहावे असे आव्हान केले.
अध्यक्षीय भाषणात श्री संजय म्हात्रे यांनी आपल्या काव्यात…
 “दोंदे संघटना खूप महान आहे,
 सदस्य म्हणून मी लहान आहे.
 दुभंगलेल्या सदस्यांना समस्येची जाण आहे.
 जखमी झाले अंगण माझे
 जरी जळालो असा
 गर्वाने म्हणत जगेन,
 दोंदे संघटना आपली महान आहे.”
संघटना वाढीसाठी आपण सर्व सभासदांनी प्रयत्न करावे तसेच तालुका स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मा गटशिक्षणाधिकारी यांच्या समवेत मुलाखत आयोजित करण्यात येईल .तसेच सर्वांना शिक्षक संघ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरचिटणीस श्री प्रकाश खडस यांनी उत्तम प्रकारे केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत