अखेर आयजॅकची मृत्यशी झुंज अपयशी ! शाळेवर शोककळा

माथेरान : मुकुंद रांजाणे

बालपणापासून माथेरान मध्ये शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलेल्या मुंबई (वसई)येेथील आयजॅक ब्रिटटो  या शालेय विद्यार्थ्याचा दुर्धर आजाराशी सामना करताना त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवल्याने शाळेवर शोककळा पसरली आहे.
शालेय जीवनातील अनेक चढउतार तेसुद्धा माथेरान सारख्या दुर्गम भागात मुंबई येथून आलेल्या येथील सेंट झेव्हियर या शाळेतील वसतिगृहात तेसुद्धा इयत्ता तिसरी पासूनच आईवडील यांचा दुरावा सहन करीत दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आयजॅक ब्रिटटो याने माथेरानमध्ये इयत्ता तिसरीपासून प्रवेश केल्यावर विद्यार्थीदशेत शालेय अभ्यासक्रमातील दहावीपर्यंत अभ्यासात नाविन्यपूर्ण यश संपादन केले होते. पण त्याला सहा महिन्यांपूर्वी अप्लास्टिक ऍनिमिया या दुर्धर आजाराने गाठले.त्यातून सुद्धा त्याने दहावीच्या परीक्षेत नुकताच ६८% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला होता.सर्वांशी त्याने अत्यंत जिव्हाळ्याचे हितसंबंध जपलेले असल्याने सर्वच विद्यार्थी मित्रांचा अन शिक्षकांचा तो लाडका अन प्रिय विद्यार्थीमित्र होता.या दुर्धर आजारामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर त्याला ताबडतोब मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी त्याला हा दुर्धर फुप्फुसाचा आजार असल्याचे समजताच त्याच्या आईने चिंतेने व्याकुळ होऊन दोन महिन्यांपूर्वी आपला देह ठेवला होता.घरात वडील आणि तो असे दोघेच होते. घरची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हालाखीची असल्याने माथेरान मधील शिक्षक योगेश जाधव यांनी त्याच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य केलेले होते.आज दि.१९ रोजी पहाटे चार वाजता त्याची मृत्यूशी झुंज एकाकी पडली आणि त्याची प्राणज्योत मालवली.
———————————————————
आयजॅक हा अत्यंत गुणी मुलगा होता प्रेमळ स्वभाव तसेच सर्वांशी मिळतेजुळते घेऊन राहणारा होता त्याच्या निधनापूर्वी दोन दिवस मी आणि येथील नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी त्याची मुंबई येथे दवाखान्यात भेट घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला होता पण तो मृत्यूच्या लढाईशी झुंज देऊ शकला नाही.आम्हाला हा शोक अनावर होत आहे. योगेश जाधव— शिक्षक माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत