अखेर ‘त्या’ गावाचे नाव बदलले

भोपाळ: रायगड माझा

पन्ना जिल्ह्यातल्या एका मागास गावातल्या गावक-यांना आता गावाचे नाव सांगण्यास लाज वाटणार नाही. या गावातील लोकांनी गावाचे छक्का हे नावच बदलून टाकले आहे. आता या गावाचे नाव महगवान सरकार असे ठेवण्यात आले आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, पन्ना जिल्ह्यातल्या या गावाला 1924 रोजी महगवान छक्का असे नाव पडले. गावातले माजी तहसीलदार फैज मोहम्मद यांच्यामते, गावाचे नाव असे का ठेवण्यात आले हे अद्याप कोणालाही माहीत नाही. 2013मध्ये गावच्या पंचायतीकडून नाव बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. गावातले रहिवासी अनिल कुमार पाठक म्हणाले, गावातल्या लोकांना स्वतःच्या गावाचे नाव सांगताना लाज वाटत होती. त्यानंतर महगवान हे नाव काढून फक्त छक्का ठेवण्यात आले होते.

दोन वर्षांपूर्वी राज्याकडून केंद्राला नावाचे गाव बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर 7 सप्टेंबर 2017 ला केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी होत आता गावाचे नाव बदलून महगवान सरकार ठेवण्यात आले आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार महगवान सरकार गावात 280 कुटुंबे राहतात. गावाची एकूण लोकसंख्या 1139 एवढी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत