अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपने हटवले ‘ते’ 60 लाख व्हिडिओ

रायगड माझा वृत्त

टिकटॉकवर बेकायदेशीर आणि अश्लील कंटेंटवर रोख बसावी यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहोत असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. भारतात टिकटॉकचा विरोध वाढत आहे, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नोटीस पाठवून टिकटॉककडे जवळपास दोन डझन प्रश्नांची उत्तरं मागितली होती.

यातील बहुतांश प्रश्न लहान मुलांच्या अश्लील व्हिडिओ आणि देशविरोधी व्हिडिओबाबत होते. हटवलेल्या व्हिडिओंमध्ये जुलै 2018 पासून आतापर्यंतच्या व्हिडिओंचा समावेश होता. अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 60 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. हे व्हिडिओ भारतातील मार्गदर्शक तत्त्वांचे(कंटेंट गाइडलाइन) उल्लंघन करणारे होते.

‘बाइटडान्स’चं ‘टिकटॉक’ तोपर्यंत चीनमध्ये ‘डौइन’ या नावानं ओळखलं जात होतं. चीनमधील ‘बाइटडान्स’ नावाच्या कंपनीच्या मालकीचं हे अ‍ॅप. तसं तर या अ‍ॅपचा अधिकृत जन्म सप्टेंबर २०१६चा. पण २०१४मध्ये जगभरात प्रसिद्ध झालेल्या शांघायस्थित ‘म्युझिक.ली’ या अशाच ‘लिपसिंकिंग’ अ‍ॅपच्या स्टार्टअपची खरेदी करून ‘टिकटॉक’ने आपला विस्तार केला.  ‘टिकटॉक’ हे १५ सेकंद ते एक मिनिटाचे ‘लिपसिंकिंग’ व्हिडीओ रेकॉर्ड करून ते शेअर करण्यासाठी तयार करण्यात आलेलं अ‍ॅप आहे. तब्बल ७५ अब्ज डॉलर मोजून २०१७मध्ये ‘बाइटडान्स’नं ‘म्युझिक.ली’ खरेदी केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत