अजब कारभार; एकाच फ्लॅटची दोघांनी विक्री

नाशिक : रायगड माझा वृत्त

मूळ मालकाला अंधारात ठेवून बिल्डर आणि एजंट यांनी संगनमताने एकदा विक्री केलेल्या फ्लॅटची दुसऱ्यांदा विक्री केली. या प्रकरणी चंद्रेश सतीश तिवारी (वय ३०, रा. आदित्य हाइट्स, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमादिन कन्स्ट्रक्शनचे भागीदार भाईलाल पटेल आणि एजंट चंद्रेश प्रजापती (रा. सिडको) या दोघांविरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी चंद्रेश तिवारी यांनी एजंट चंद्रेश प्रजापती याच्या माध्यमातून जेलरोडच्या उमादिन कन्स्ट्रक्शनचे नरेश व नवीन पाटील या बिल्डरच्या प्रथमेश पार्कमधील ए विंगच्या १०३ क्रमांकाचा फ्लॅट वर्षभरापूर्वी २३ लाख ४९ हजार रुपयांना खरेदी केला होता. तसा सह दुय्यम निबंधक वर्ग २ नाशिक २ यांच्याकडे करारनामाही नोंदविण्यात आला. जून २०१७ मध्ये आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याने उमादिन कन्स्ट्रक्शनचे भागीदार भाईलाल पटेल यांनी फ्लॅटची चावीही तिवारी यांना दिली. त्यानंतर तिवारी यांनी या फ्लॅटमध्ये आपले साहित्य ठेवत स्वतःचे कुलुपही लावले. मात्र वर्षभर तिवारी यांना नोकरीनिमित्त नाशिकच्या बाहेर जावे लागले. मे २०१८ मध्ये तिवारी पुन्हा आपल्या प्लॅटवर आले असता त्यांना फ्लॅटमध्ये भाडेकरी वास्तव्याला असल्याचे आढळून आले. त्रिलोकसिंग रिपियाल यांनी हा फ्लॅट खरेदी केल्याचे तिवारी यांना चौकशीदरम्यान आढळले. रिपियाल यांनी भाईलाल पटेल व एजंट चंद्रेश प्रजापती यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये आपल्याला विक्री विक्री केला. त्या व्यवहाराचे दस्तही सह दुय्यम निबंधक वर्ग २ नाशिक २ यांच्याकडे नोंदविण्यात आल्याचे उघड झाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत