‘अजिंक्य’ भारत ..!! नवख्या टीम इंडियाचा कांगारुंवर विजय

IND vs AUS 4th Test 2021: टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 'अजिंक्य', डाऊन अंडर  रेकॉर्ड-ब्रेक कारनामा करणारा विराट याच्यानंतर ठरला दुसरा भारतीय कर्णधार ...

महाराष्ट्र News 24

नवख्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला चौथ्या कसोटी सामन्यात धूळ चारली आहे. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने पराभव करुन मालिका 2-1 खिशात घातली. टीम इंडियानं ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवत इतिहास रचला. भारताने मोठ्या थाटात ब्रिस्बेन ग्राऊंडवर विजयी जल्लोष केला.

भारतीय संघाच्या या विजयामध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत यानी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. रिषभ पंत यानं 89 धावांची ऐतिहासिक खेळी केली. रिषभ पंतनं विजयी चौकार खेचत बॉर्डर गावस्कर मालिकेत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. एकापाठोपाठ एक संकटांची मालिका टीम इंडियावर होती. परंतु टीम इंडिया या सगळ्या संकटांना पुरुन उरली. भारताच्या विजयावर अनेक दिग्गज खेळाडू, मान्यवर खूश आहेत.

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या नवख्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पराभूत केले. तुमच्याबद्दल अभिमान वाटतो, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. तर ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयासाठी भारतीय संघाचं अभिनंदन… भारतीय क्रिकेटसाठी आजचा विजय निश्चित ऐतिहासिक आहे.. वेल डन टीम इंडिया, असं ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. अभिनेता रितेश देशमुख याने देखील टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. भारतीय संघाने विजय साजरा केल्याबरोबर ‘इंडिया झिंदाबाद’ अशा शब्दात त्याने टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला.

 

दरम्यान, आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांच आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या 56 धावांच्या जोरावर पूर्ण केले. दुसऱ्या डावात शुभमन गिलंनं 91 धावा केल्या. कॅप्टन अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतनं आक्रमक फलंदाजी करत 138 चेंडूमध्ये 9 चौकार, एक षटकारासह 89 धावांची विजयी खेळी केली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी यांच्या साथीनं मैदानावर तळ ठोकून उभं राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत