अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी आज धम्मपरिषद

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त बौद्ध बांधवांच्या सहभागाची परंपरा असलेली 13 वी अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषद आज 23 नोव्हेंबर रोजी मराठवाडय़ातील अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी पार पडणार आहे. त्याची घोषणा त्या परिषदेचे निमंत्रक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी आज मुंबई येथे एका पत्रकार परिषदेत केली.

आंबेडकरी धम्म क्रांतीच्या सुवर्ण महोत्सवी (2006) वर्षापासून ही धम्मपरिषद दरवर्षी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी सोयेगाव (ता.फर्दापूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ पाली अॅण्ड बुद्धिझम या संस्थेतर्फे दरवर्षी भरविली जाते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड हे या संस्थेचे अध्यक्ष असून पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो हे या संस्थेचे सचिव आहेत.

संभाजीनगर जिल्हय़ातील जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणी येथे या संस्थेने 71 एकर जमीन खरेदी केली आहे. तिथे नजीकच्या काळातच पाली भाषेचे विश्वविद्यापीठ उभारण्याचा आमचा संकल्प आहे, अशी माहिती डॉ.जी.के.डोंगरगावकर यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत