अजित दादा आले रे !! प्रशासनाची पळापळ सुरू ..!

महाराष्ट्र News 24 वृत्त

मंत्रीपदी निवड झाल्यानंतर हारतुरे आणि सत्काराचे कार्यक्रम टाळत प्रत्येक दिवस महत्वाचा या नियमानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे. सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य या त्यांच्या स्वभावानुसार शपथविधीनंतर लगेचच मुंबईत मंत्रालयात त्यांनी मुख्य सचिवांसह प्रमुख अधिका-यांच्या बैठका घेत आढावा घेतला.

सकाळी पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत काम करत त्यांनी विविध प्रश्न समजून घेतले. शपथविधीनंतर लगेचच दुस-या दिवशी मंत्रालयात दालन घेत त्यांनी राज्याची स्थिती समजून घेतली. रात्री उशीरापर्यंत त्यांनी विविध प्रश्नांबाबत विविध अधिका-यांकडून माहिती त्यांनी घेतली. मुरब्बी आणि प्रशासनाची रेघ न रेघ माहिती असलेल्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आपल्या स्टाईलने कामास सुरवात केल्यानंतर मंत्रालयापासून जिल्हा स्तरावर अधिका-यांनीही पळापळ सुरु केली आहे. विविध विषयांच्या फाईल्स अपटूडेट करण्यासोबतच प्रश्नांची माहितीही अधिकारी बारकाईने करुन घेत आहेत. अजित पवार यांच्या समोर जाताना अभ्यास करुन जावे लागते याची अनेकांना माहिती असल्याने प्रशासनही आता खडबडून जागे झाले असल्याचे चित्र आहे. मुळातच काम सुरु करण्यास दोन महिन्यांचा उशीर झालेला आहे ही बाब विचारात घेता इतर बाबींना फाटा देत थेट कामावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना अजित पवार यांनी सर्व सचिव व प्रमुखांना दिल्या आहेत. या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रशासनाकडून त्याच पध्दतीने सहकार्याची अजित पवार यांची अपेक्षा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत