अजित पवारांचा मुलगा कामकाज पाहण्यासाठी विधानभवनात!

नागपूर : रायगड माझा वृत्त 

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी विधानभवनात हजेरी लावली.

अजित पवारांचा मुलगा कामकाज पाहण्यासाठी विधानभवनात!

राज्य विधीमंडळाचं कामकाज जाणून घेण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांची दुसरी पीढी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. कारण नागपुरात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाला नेत्यांची मुलं हजेरी लावत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी कालच नागपुरात हजेरी लावत, विधीमंडळाचं कामकाज पाहिलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी विधानभवनात हजेरी लावली.

आदित्य ठाकरे हे अधिवेशन असताना मुंबईत हजेरी लावतात. यावेळी त्यांनी नागपूरमध्येही उपस्थिती लावली. त्यानंतर आज पार्थ पवारदेखील कामकाज पाहण्यासाठी नागपूरला आले. पार्थ पवार यांनी संविधान मार्चमध्ये मुंबईत सहभाग घेतला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत