अजित पवारांना दिलेल्या क्लिन चीटवर फडणवीसांचा आक्षेप

नागपूर: महाराष्ट्र News 24 वृत्त

सिंचन घोटाळ्या प्रकरणी एसीबीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणी क्लीन चीट दिल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या क्लिन चीटवर आक्षेप घेतला आहे. वेळ पडल्यास आपण या प्रकरणात मध्यस्ती अर्ज करू अशी भूमिकाही फडणवीस यांनी घेतली आहे.

Image result for अजित पवार देवेंद्र फडणवीस"

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल केलेले शपथपत्र हे जुन्या शपथपत्राच्या पूर्णत: विसंगत असल्याचेही फडणवीस म्हणाले. याद्वारे सिंचन घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. अजित पवार दोषी असल्याचा एसीबीकडे पुरावा नाही असे म्हणणे म्हणजे दिशाभूल करण्यासारखे असल्याचेही ते म्हणाले. त्यांना जेवढी सोईची आहे तितकीच आणि किंबहुना त्रोटत माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत