अजित पवारांनी सांगितले रहस्य

पिंपरी : रायगड माझा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता स्वीकृत सदस्यपदी एकच सदस्य निवडून येत होता; मात्र संजय वाबळे रिंगणात असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असे काहींनी सांगितले त्यामुळे वाबळे यांना उमेदवारी द्यावी लागली या शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकृतचे रहस्य उघड केले.

पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या भोसरी येथील बैठकीत पक्षाचे कार्यकर्ते आनंदा यादव यांनी पवार यांना पत्र दिले. त्यात वाबळे हे एकदा नगरसेवक झाले. या वेळी पालिका निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी दिली याबद्दल नाराजी व्यक्त केली.  अजित पवार यांनी त्याचे जाहीर उत्तर दिले. पवार म्हणाले, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला 36 जागा मिळाल्या हे संख्याबळ पाहता एकाच व्यक्तीला स्वीकृतपदी संधी मिळणार होती. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे महापालिका निवडणुकीपूर्वी 12 -15 नगरसेवक घेऊन आले होते.

राष्ट्रवादी कोणाला नुसती वापरून घेत नाही हा संदेश लोकांत जाणे गरजेचे होते म्हणून भोईर यांचे नाव नक्की केले.  दुसरी जागा संख्याबळ कमी असल्याने जिंकणे अवघड होते. मात्र संजय वाबळे रिंगणात असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असे काहींनी सांगितले त्यामुळे वाबळे यांना उमेदवारी दिली असा तसा एक कार्यकर्ता स्वीकृतपदी बसणार होता.  वाबळे यांच्यामुळे दुसराही बसला.  या शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकृतचे रहस्य उघड केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत