अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकाच व्यासपीठावर

इंदापूर : विजय शिंदे

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये पुण्यातील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठकी दरम्यान बऱ्याच वेळ चर्चा झाली. यामुळे या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्या मध्ये असणारे राजकीय सख्य संपूर्ण महाराष्ट्रला परिचित आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवास अजित पवार हे संपूर्ण ताकद लावत असत त्यामुळे आघाडी सरकार मध्ये असताना या दोन्ही माजी मंत्र्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळायचा परंतु अलीकडील काळात या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. हर्षवर्धन पाटील यांनी कॉग्रेसच्या नेत्यांच्याही भेटी घेतल्या. यावेळी हर्षवर्धन पाटील यांना परतण्याचा काही विचार आहे का? असे विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी आहे तिथे समाधानी आहे परत येण्याचा विचार नाही आणि आपले जुने मित्र भेटल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत