अज्ञाताने ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरले

पुणे: रायगड माझा

एका ज्येष्ठ पदचारी महिलेचे चोरी झाल्याचा बहाणा करत 45 हजाराचे मंगळसूत्र चोरण्यात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अंजना निकम (62, रा. माळवाडी, हडपसर) या मंगळवारी दुपारी पायी त्यांच्या रहात्या घरी चालल्या होत्या.

यावेळी संजीवन हॉस्पिटलजवळ एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याने तुमचे मंगळसूत्र बॅगमध्ये काढुन ठेवा, पुढे चोरी झाली आहे असे सांगितले. त्याच्या बहाण्याचा भुलून फिर्यादीने मंगळसूत्र त्याच्या हातात दिले. त्याने ते हॅण्डबॅगमध्ये ठेवण्याचा बहाणा करुन हात चलाखीने चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक झंजाड तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत