मुंबई : रायगड माझा
चोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर अटकेच्या भीतीने दोन चोरट्या महिलांनी भर बाजारात ड्रामा सुरु केला. महिलांचा ड्रामा पाहून पोलिसही थक्क झाले. मोठी कसरत करून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.
मुंबईतील मालाड येथील डायमंड मार्केटमध्ये गेल्या सोमवारी हा हाय होल्टेज ड्रामा झाला. एका महिलेने पोलिसांना छेडछाडचा आरोप करत आरडाओरड केली तर दुसर्या महिलेने चक्क अंगावरचे ब्लाऊज फाडले. ते अंर्तवस्त्र काढण्याच्या तयारीत होती. वेळीत पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. दोन्ही महिला सख्ख्या बहिणी असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सरिता (30) आणि सुजाता (35) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोन्ही जोगेश्वर भागात राहात असून त्या सराईत गुन्हेगार आहेत. दोघींवर मुंबईत 10 घरांमध्ये चोरी करण्याचा आरोप आहे. सरिता आणि सुजाताने एक आठवड्यापूर्वी बोरीवलीमधील कस्तुरबा मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये मोठा डल्ला मारला होता. दोघींनी सोन्याचे दागिने लंपास केले होते. अपार्टमेंटमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली होती. जुहू, सांताक्रुज, वनराई, खार, घाटकोपर भागात दोन्ही महिलांनी काम मिळवण्याच्या बहाण्याने चोर्या केल्या आहेत.