अडीच लाखांची लाच घेताना तहसीलदार अटकेत

कोल्‍हापूर : रायगड माझा 

साताबारा कागदपत्रावर नाव लावण्यासाठी अडीच लाख रूपयांची लाच घेतल्‍याप्रकरणी कागल तालुक्‍याच्या तहसीलदारांना अटक करण्यात आली. किशोर घाडगे असे अटक करण्यात आलेल्‍या तहसीलदाराचे नाव आहे. या तहसीलदारासोबतच महिला तलाठी शमशहाद मुल्‍ला आणि मनोज भोजे यांनाही लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, कागल तालुक्‍यातील कसबा सांगाव येथील संजय धोंडीराम जगताप यांच्या वडिलांनी २०१२ साली सुळकुड येथे जमीन खरेदी केली होती. त्‍या जमीनीच्या सातबारावर नाव नोंद करण्यासाठी सुळकुडच्या महिला तलाठी मुल्‍ला यांनी तहसीलदार किशोर घाडगे यांच्यासाठी दोन लाख रूपये आणि स्‍वत:साठी एक लाख रूपयांची लाच मागितली होती. संजय जगताप यांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली. आज (१७ मे)दुपारी कागल येथे लाचेची रक्‍कम देण्याचे ठरले. त्‍यानुसार लाचेचे पैसे घेण्यासाठी मुल्‍ला कागल येथे आल्‍या. जगताप यांनी त्‍यांच्याकडे अडीच लाख रूपये दिले. त्‍यातील दोन लाख रूपये घाडगे यांना देण्यासाठी तलाठी मनोज भोजे यांनी ती रक्‍कम घेताना लाचलुचपत विभागाने त्‍यांना रंगेहाथ पकडले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत