अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर शहांसोबत चर्चा झाली होती: संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त 

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच पत्रकारांशी संवाद साधून राऊत यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व दावे फेटाळले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जी चर्चा झाली होती त्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा होता, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेने कधीही व्यक्तिगत टीका केलेली नाही, असेही राऊत यांनी नमूद केले. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असे नितीन गडकरी यांनीही म्हटले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मातोश्री निवासस्थानी युतीची चर्चा झाली तेव्हा गडकरी तिथे नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, हे उद्धव ठाकरे यांचे विधान धक्का देणारे होते, असे नमूद करताना शिवसेना भाजपसोबत चर्चा करत नाही मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध निवडणुका आम्ही लढलो त्यांच्यासोबत रोज चर्चा करत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत