अति गोड खाल्ल्यानं तरुणाला आला अर्धांग वायूचा झटका

पुणे : रायगड माझा ऑनलाईन 
दिवाळीत जास्त मिठाई खाल्ल्यानं तरुणाला अर्धांग वायूचा झटकाआल्याची घटना राजगुरू नगर इथं घडली आहे. निलेश राळे असं या तरूणाचं नाव असून हाइपोकॅलेमिक पेरिऑडीक पॅरालिसिस या आजारानं तो ग्रस्त होता. असं असतानाही गोड खाण्याची आडव त्याला चांगलीच महागात पडली असून अती गोड खाल्ल्यानं त्याच्या शरिरातील पोटॅशियमचं प्रमाण कमी झालं आणि त्याला अर्धांग वायूचा झटका आला.
७ नोव्हेंबर रोजी निलेश त्याच्या बहिणीला घरी सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याला अचानक अशक्तपणा आला. अचानाक त्याच्या स्नांयूची हालचाल बंद झाली आणि नेमकं काय होतंय हे त्याच्या लक्षात आलं नाही. अशा परिस्थितच तो डॉक्टरकडे गेला. परंतु पुरेशा सुविधा नसल्यानं डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर निलेशनं तात्काळ साईनाथ हॉस्पिटल गाठलं. तिथं त्याच्यावर काही उपचार करण्यात आले.
परंतु एक्सरे आणि एमआरआयमध्ये देखील त्याच्या आजाराचं निदान होऊ शकलं नाही. त्यानंतर निलेशला तब्बल १२ तास डॉक्टरांच्या देखरेखीखालीठेवण्यात आलं. परंतु इथंही आजाराचं निदान होत नसल्यानं त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी निलेशला जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्याच्या आजाराचं नेमकं निदान करण्यात डॉक्टरांना यश आलं.

निलेशनं त्याच्या सर्व अवयवांरील ताबा गमावला होता. त्याचे जुने रिपोर्ट्स पाहून आम्ही इसीजी आणि काही रक्ताच्या चाचण्या केल्या. त्यात निलेशच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी फारच कमी झाल्याचं निदर्शनास आलं. दिवाळीत गोड पदार्थ आणि मिठाई जास्त खाल्ल्यानं त्याच्या रक्तातील पोटॅशियम कमी झालं होतं अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली. निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले त्यामुळं त्याच्या तब्येतीत झपाट्यानं सुधारणा झाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत