‘अती घाई संकटात नेई’: दिवा रेल्वे फाटकावर एक्स्प्रेसने उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई :रायगड माझा 

ठाण्यातील दिवा रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करणा-या दोन दुचाकीस्वारांना समोरून येणा-या एक्स्प्रेसने उडवले. यात या दोनही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही युवक दिवा गावातीलच आहे. त्यांची नावे समोर आली आहेत. पोलिस तपास करत आहेत.

याबाबतची माहिती अशी की, दिवा गावातील दोन तरूण आज सकाळी 11 च्या सुमारास अॅक्टीव्हा या दुचाकीवरून चालले होते. यादरम्यान ते दिवा रेल्वे फाटकाजवळ आले. तेथून एक्स्प्रेस जाणार असल्याने अनेक जण फाटकाजवळ थांबले होते. मात्र, या तरूणांनी फाटक ओलांडण्याची घई केली. समोरून वेगाने एक्स्प्रेस येत असल्याचे दिसत असतानाही गाडी चालवणा-याने अॅक्टीव्हा दामटली. मात्र, वेगाने धावणा-या या दोघांना रेल्वे रूळ क्रॉसिंगवर जोराची धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

‘अती घाई संकटात नेई’ ही म्हण या दुचाकीवरील दोघांना बरोबर लागू लागली. दोन मिनिटांसाठी त्यांनी आपला जीव गमावला. तसेच तरूण मुले किती व कशी बेदरकार झाली आहेत हे ही यानिमित्ताने समोर आले आहे. रेल्वेतर्फे प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ क्रॉसिंग करू नये यासाठी अनेक जाहिरातींमधून जनजागृती करत असते पण त्याचा लोकांवर काहीही परिणाम होताना दिसत नसल्याचे समोर आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत