अनंत गीते यांनी प्रचारसभेत एकाही भाषणात स्व.बाळासाहेबांचा उल्लेख केला नाही – सुनील तटकरे

म्हसळा : निकेश कोकचा

मागील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी अनंत गीते यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रत्नागिरी लोकसभेची तिकीट देऊन निवडून आणले अश्या  बाळासाहेबांचा उल्लेख 2014 साली झालेल्या निवडणुकीत अनंत गीते यांनी एकाही भाषणात केला नाही त्यावेळी ते प्रत्येक भाषणात  हर हर मोदी घर घर मोदी असेच बोलत होते असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार सुनील तटकरे यांनी म्हसळा येथील आगरी समाज सभागृह येथे झालेल्या जाहीर सभेत केला.
तालुका अध्यक्ष पदी समीर बनकर यांची तर जिल्हा मुख्य संघटकपदी बालशेठ करडे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर, बालशेठ करडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजीम हसवारे , राष्ट्रवादीचे नेते अलिशेठ कौचाली, समीर बनकर,सभापती उज्वला सावंत, नगराध्यक्ष कविता बोरकर, उपसभापती मधू गायकर, जिल्हापरिषद सदस्य बबन मनवे, संदीप चाचले, छाया म्हात्रे, फैसल गीते,दिलीप कांबळे, संतोष पाखड, गजानन पाखड आणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील तटकरे यांनी गीते साहेबाना चॅलेंज दिले कि तुम्ही केंद्रातील अवजड मंत्री आहात मंत्री मंडळाच्या बैठकीला जाता कधीतरी एकदा आपल्या कोकणातील जनतेला बरे वाटावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कामांबाबत निवेदन द्या आणी निवेदन देतानाचा फोटो व्हाट्सप ला टाका आणी लिहा झी 24 तासाच्या मुलाखतीत तुम्ही म्हंटल्या प्रमाणे  केंद्रसरकार कोकणात मागणी केलेला मोठा कारखाना काढणार नाही तर पंतप्रधानांच्या धोरणामुळे कारखाना आणता येणार नाही असे तुम्ही लिहून दया तुम्हाला पुढील खासदारकी बिनविरोध देऊ असेही सांगितले.
यावेळी तटकरे यांनी केंद्र सरकारवर सुद्धा जोरदार टीका केली. या झालेल्या सभेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेल्या तालुका अध्यक्ष पदी समीर बनकर यांची तर जिल्हा मुख्य संघटकपदी बालशेठ करडे यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच नुकत्याच झालेली दहा ग्रामपंचायतिचे सरपंच आणी सदस्य यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेच्या सकलप खारगाव खुर्द येथील अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत