अनधिकृत शाळांची यादी तात्काळ घोषित करा; मंगल घरत यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई : साईनाथ भोईर 

नवी मुंबई शहरात काही शिक्षण संस्थाने मान्यता प्राप्त नसून देखील या शाळांमध्ये प्रवेश देऊन शिक्षण दिले जात आहे. आणि अशा अनधिकृत शाळांची यादी नवी मुंबई महानगर पालिका दरवर्षी जाहीर करते. मात्र ही यादी मनपा उशीराने जाहीर करीत असल्याने तोवर प्रवेश प्रकिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे नवी मुंबईतील विद्यार्थ्याचा अनधिकृत शाळेत प्रवेश होऊ नये म्हणून या शाळांची यादी तात्काळ जाहीर करून तसे फलक त्या शाळांसमोर लावावे, अशी मागणी भाजप महिला मोर्च्याच्या सरचिटणीस मंगल घरत यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांची नोंदणी मनपा जिल्हा परिषद व राज्य शिक्षण संचालक यांच्याकडे करणे बंधनकारक आहे. मात्र नवी मुंबईत काही खाजगी शिक्षण संस्था मान्यता प्राप्त नसून देखील शिक्षण देत आहेत. आणि अशा अनधिकृत शाळांची यादी नवी मुंबई मनपा दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर घोषित करते. मात्र ही यादी घोषित करेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन अनधिकृत शाळांच्या पटलावर प्रवेश प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे सरकारी नियम तुडवून होणाऱ्या या प्रवेशाला मनपा शिक्षण विभाग ही तितकाच जबाबदार आहे. दरवर्षी या यादीमध्ये शाळांची संख्या कमी अधिक होत असते. याचे कारण मनपा प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या आढाव्यातील कमतरता हे आहे. साधारणपणे जून महिन्यात शाळा सुरू होतात. आणि त्या आधी डिसेंबर पासून केजी आणि सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते. त्यामुळे या अनधिकृत शाळांची यादी त्याआधी जाहीर करणे गरजेचे आहे. जेणेकरून शिक्षण हक्कापासून कोणी वंचित राहणार नाही. मात्र नवी मुंबई शिक्षण विभाग डोळ्यावर झोपडे लावल्यागत मार्च महिन्यात यादी जाहीर करते. आणि ही यादी जाहीर करेपर्यंत प्रवेश झालेला असतो. त्यामुळे नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता असल्या अनधिकृत शाळांची यादी तात्काळ जाहीर करून जनतेला सजग करण्याकरिता त्या प्रत्येक शाळेबाहेर ती शाळा अनधिकृत असून त्या शाळेत प्रवेश घेऊ नये असे फलक लावण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष नवी मुंबई महिला मोर्च्याच्या सरचिटणीस मंगल घरत यांनी मनपा आयुक्त या अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

——————————————

नेरुळ मधील सिवूडस परिसरात एका शाळेचे बांधकाम सध्या सुरू असून त्याच ठिकाणी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आद्यपी इमारत तयार नसताना प्रवेश प्रकिया कोणत्या आधारावर केले जात आहे? याचीही चौकशी करावी. व संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील घरत यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत