अनिकेत तटकरे यांनी घेतले धाविर महाराजांचे दर्शन

विधानपरिषद उमेदवारी जाहीर होण्याबाबत समर्थकांच्यात उत्सुकता

रोहे: महादेव सरसंबे

रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज यांचे दर्शन बुधवार 2 मे रोजी राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते अनिकेत तटकरे यांनी घेतले. या दर्शनवारीमुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी अनिकेत तटकरे यांनाच जाहीर होणार अशी उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये लागली असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून अधिकृतरित्या विधानपरिषदेच्या उमेदवाराची घोषणा न झाल्यामुळे ह्या जागेकरिता अनिकेत तटकरे यांच्या नावाची घोषणा होते कि अन्य कोणाला संधी मिळते ते आजही गुलदस्त्यामध्ये आहे.  कोकण स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या विधानपरिषदेच्या जागे करीता शिवसेनेकडून ॲड. राजीव साबळे हे 2 मे रोजी रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत.राष्ट्रवादीकडून मात्र कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा अधिकृतरित्या करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर आ. सुनिल तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा या उमेदवारी करीता होत आहे.

या धर्तीवर आपल्याला उमेदवारी मिळावी याचे साकडे घालण्यासाठी आज त्यांनी रोहा नगरिचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज यांचे दर्शन घेतले. या वेळी आपल्या लाडक्या युवा नेत्याला ही उमेदवारी मिळणार अशी उत्सुकता रोहा शहरासह ग्रामीण भागातील जेष्ठ नेत्यांसह युवक वर्गा मध्ये लागलेली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत