अनिकेत तटकरेंच्या आमदारकीची वाट बिकट

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीला आघाडीतील घटकपक्षांकडून दगाफटका होण्याची शक्यता; निवडणुकीत तटकरे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागणार 

म्हसळा : निकेश कोकचा

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री आ.सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादी कडून उमेदवारी जाहीर झाली.अनिकेत तटकरे यांना विजयापर्यंत पोहचवण्यासाठी मतांचे गणित जुळावे म्हणून राष्ट्रवादीने कॉंग्रेस(आय),मनसे,रिपाई बरोबर आघाडी केली. आ.तटकरे यांनी पुत्रासाठी राष्ट्रवादीने आघाडी केली असली तरी, तटकरे कुटुंबाला थांबवण्यासाठी थेट राष्ट्रवादीला दगाफटका देण्याच्या तयारीत याच आघाडीतल्या घटकपक्षांकडून तयारी चालू असल्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
Image may contain: 2 people, people smiling
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मधून निवडून आलेले राष्ट्रीय सरचिटणीस आ.सुनील तटकरे यांचे बंधू आ.अनिल तटकरे यांचा कार्यकाल संपत आला असून कौटुंबिक वादामुळे त्यांना पुन्हा संधी न देता या जागी इच्छुक राष्ट्रवादी नेते दत्तात्रय मसुरकर यांना उमेदवारी न देता थेट आ.अनिल तटकरे यांचे पुतणे म्हणजे अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही होत असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्येच सुरु आहे.आ.सुनील तटकरे यांनी राजकारणात वरचढ होण्यासाठी रायगडच्या अनेक सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांना साम,दाम,दंड,भेद चा वापर करून राजकीय संन्यासात पाठवली आहे.याच राजकीय संन्यासात गेलेल्या नेत्यांजवळ चीरंजीवाचा विजय व्हावा म्हणून आघाडी केली असली तरी आता आ.तटकरे यांना राजकीय संन्यासात पाठवण्याच्या तयारीत हे सर्वपक्षीय नेते असल्याची माहिती हाती लागली आहे.यामुळे अनिकेत तटकरेंच्या आमदारकीची वाट बिकट झाली असून या निवडणुकीत आ.सुनील तटकरे यांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रवादीने कॉंग्रेस(आय),मनसे आणि रिपाई बरोबर आघाडी जरी केली असली तरी घटक पक्षातील सर्वात मोठा असणाऱ्या कॉंग्रेस पक्षातील अलिबाग मधील मा.आ.मधुकर ठाकूर,पेण येथील माजी मंत्री रवीशेट पाटील आणि महाड मधील माजी आ.माणिक जगताप राष्ट्रवादीला मदत करतील का?हे निवडणूक निकालावरून नक्कीच स्पष्ट होणार आहे.
  • मागील महिन्यामध्ये १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित तालुकाध्याक्षांची सभा कॉंग्रेस उप जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या घरी झाली होती.या सभेमध्ये कॉंग्रेसने राजकारणातील आपला नंबर वन चा शत्रू राष्ट्रवादीला मानून हायकमांडने जरी आघाडीचा आदेश दिला तरी रायगड मध्ये राष्ट्रवादीला मदत न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयामुळे तटकरे कुटुंब निवडणुकीत चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.