अनिकेत हॉटेल मधील कामगारांचा कालव्यात आढळला मृतदेह! घातपात की अपघात ?

कोलाड : कल्पेश पवार 

मुंबई -गोवा महामार्ग जवलिल चिंचवली पोट-कालव्यात हॉटेल अनिकेत मध्ये काम करण्याऱ्या कामगारांचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना कोलाड मध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीला हा मृतदेह आढळून आल्याने हा अपघात की घातपात अशी उलटसुलट चर्चा कोलाड मध्ये दिवसभर रंगली होती.

मिळालेल्या अधिक माहिती नुसार अनिकेत हॉटेलमध्ये काम करणारा कामगार राजू जाधव ऊर्फ चव्हाण वय (५० ) रा.चिंचवली हॉटेल अनिकेत माघे या इसमाचा मंगळवार दि.11 रोजी दुपारच्या सुमारास चिंचवली पोट कालव्यात मृतदेह आढळून आला.
त्यामुळे हा अपघात की घातपात अशी उलट सुलट चर्चा कोलाड मध्ये दिवसभर रंगली होती .परंतु त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचा वार किंवा रक्त निघत नसल्याने व त्यातच या इसमाने मोठया प्रमाणात दारू पिल्याने या दारूच्या नशेत अनिकेत हॉटेल मधून काळव्याच्या शेजारून जात असताना कालव्याच्या पाण्यात पडून मुत्यु झाल्याचे कोलाड पोलिसांनी सांगितले आहे.

तरी कोलाड पोलिसांत यांची अकस्मात मुत्यु अशी नोंद करण्यात आली असून ,या पुढील तपास कोलाड पोलीस करीत आहेत…

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत