अनिलभाऊ तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोलाड तंत्रनिकेतन मध्ये रक्तदान शिबीर 

कोलाड : कल्पेश पवार

ग्रामीण विकासाचे शिलेदार माजी आमदार अनिल भाऊ तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोलाड येथील श्रीमती गीता द.तटकरे तंत्रनिकेतन मध्ये तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

अनिल भाऊ तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व  जिल्हा ब्लड बॅंक,अलिबाग यांच्या सहकार्यातुन संपन्न झालेल्या सदर शिबिराचे उद्घाटन व दीपप्रज्वलन  संस्थेचे रजिस्टर अजित तेलंगे,प्राचार्य डॉ.शँकर मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्लड बँक अलिबागचे डॉ.दीपक गोसामी ,देवेंद्र चांदगावकर, संस्थेचे प्राचार्य विपुल मसाल,अभियांत्रिकी शाखा प्रमुख ऋषिकेश पवार,अनिरुद्ध मोरे, इंगळे सर, घोगले सर,पवार सर आदी प्रमुख मान्यवरांसह येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
रक्तदान म्हणजे प्राणदान,रक्तदान म्हणजे सर्वष्ठत दान हा संदेश देत या शिबिरा अंतर्गत सुमारे 106 रक्तदात्यानी उस्फूर्तपणे
रक्तदान करून रक्तदानाच्या पुण्यकार्याचा संदेश दिला. यावेळी डॉ. दीपक गोसावी,रजिस्टर अजित तेलंगे,प्राचार्य मुंडे यांनी रक्तदानाचे महत्व विशद केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत