अनिल कपूर यांचीही आजाराशी झुंज

मुंबई: रायगड माझा वृत्त

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या फिटनेसवर तरुणाई फिदा असते. ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांच्या अभिनयासह त्यांच्या फिटनेसला दाद मिळत असते. मात्र, अनिल कपूर सध्या एका आजाराशी झुंजत आहेत. अनिल कपूर मागील काही काळांपासून खांदेदुखीने त्रस्त असून उपचारासाठी जर्मनीला जाणार आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली. अनिल कपूर यांना ‘कॅल्सफक्शेन ऑफ शोल्डर’ ही व्याधी जडली आहे. यामध्ये खांद्याची हालचाल करण्यास त्रास जाणवतो. कालांतराने खांद्याची हालचाल होणे मंदावते. मागील दोन वर्षांपासून उजव्या खांद्यात कॅल्शिअम जमा झाल्यामुळे त्याचा त्रास आणखी वाढत असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले. उपचारासाठी एप्रिल महिन्यात अनिल कपूर जर्मनीला रवाना होणार आहेत. सध्या जर्मनीतील डॉक्टरांच्या नियमित संपर्कात असून काळजी घेत असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले.

मागील काही महिन्यांपासून बॉलिवूड कलाकार आजारी असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच अनिल कपूर यांच्या आजारपणाची बातमी समोर आल्यामुळे सिने चाहते काळजीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत