अनुष्का शर्मा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला डावलून पहिल्या रांगेत

लंडन : रायगड माझा वृत्त 

भारतीय क्रिकेट संघ गुरूवारी इंग्लंडविरोधात दुसरा कसोटी सामना खेळायला सज्ज झाला आहे. याआधी भारतीय संघाने लंडन येथल भारतीय हायकमीशनची भेट घेतली. या भेटीनंतर बीसीसीआयने भारतीय हाय-कमीशनसोबत एक फोटो काढला. हा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअरही केला. चाहत्यांना हा फोटो आवडेल अशी साऱ्यांची अपेक्षा होती, मात्र झाले नेमकी उलटे. लोकांनी या फोटोला ट्रोल करायला सुरूवात केली. या फोटोमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही दिसली.

भारतीय संघाच्या या दौऱ्यावर अनुष्काच्या उपस्थितीवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. या फोटोमध्ये इतर कोणत्याही खेळाडूची पत्नी उपस्थित नाही. मात्र विराटची पत्नी म्हणून अनुष्काने या बीसीसीआयच्या अधिकृत कार्यक्रमात हजेरी लावली. एवढेच नाही तर पहिल्या पंक्तीत उभी राहून फोटोही काढला. यावर क्रिकेट चाहते चांगलेच भडकले आहेत. एकीकडे अनुष्काच्या उपस्थितीवर लोक राग व्यक्त करत असताना भारतीय संघाटा कसोटी क्रिकेटचा उप- कर्णधार अजिंक्य राहणे मात्र शेवटच्या पंक्तीत उभा असलेला दिसत आहे. त्याचा चेहराही नीटसा दिसतही नाही. नेमकी याच कारणामुळे ट्विटरकर नाराज झालेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने खेळाडूंना परिवारापासून दूर राहण्यास सांगितले होते. बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे इतर खेळाडूंनी त्यांच्या पत्नीपासून दूर राहणे पसंत केले मात्र विराटने हा नियम फारसा मनावर घेतलेला दिसत नाही. त्याच्या याच वागण्यावर आता क्रिकेट चाहते प्रश्न विचारत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत