अनैतिक संबंधांच्या संशयावरून जावयाचा खून, अर्धवट जळालेले मुंडके फेकले गोदावरीत

वडीगोद्री : रायगड माझा 

अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोचा भाऊ व चुलत सासऱ्याने जावयाचा खून केल्याची घटना रविवारी अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगाव परिसरात घडली होती. केशव रामभाऊ गावडे (27, माळेवाडी, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे.

आरोपींनी आधी दारू पाजून दगडावर डोके आदळून त्याला बेशुद्ध केले व नंतर शीर धडावेगळे करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच अर्धवट जळालेला मृतदेह तीर्थपुरीच्या कालव्यात फेकला होता.

या प्रकरणी आरोपी मेव्हणा रामभाऊ अशोक लिपणे, चुलत सासरा विष्णू भागूजी शिंगाडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृत केशव रामभाऊ गावडे हा रविवारी सासुरवाडी येथे वडीगोद्री येथे आला होता. केशव गावडे, रामभाऊ लिपणे व विष्णू शिंगाडे हे तिघे जण जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगाव येथे दारू पिण्यासाठी बसले होते. केशव याचे इतर ठिकाणी अनैतिक संबंध असल्यामुळे लिपणे याच्या मनात राग होता. या दोघांनी केशव यास जास्त दारू पाजली. यानंतर लगेच दोघांनी मारहाण सुरू करून दोघांनी उचलून त्याला एका दगडावर आदळले. यानंतर तो लगेच बेशुद्ध झाला. यानंतर दोघा आरोपींनी आपल्याजवळील चाकूने मृताचे शीर धडापासून वेगळे केले. यानंतर अंगातील कपडे काढून दोघांनी त्यास उचलून नेऊन डाव्या कालव्यामध्ये फेकून दिले. यानंतर मुंडके आणि मृताच्या अंगावरील कपडे घेऊन शेतात नेऊन ते जाळून टाकले. यानंतर दोन्ही आरोपींनी महाकाळा येथील पाहुण्यांकडे मुक्काम करून सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु, याप्रसंगी कपडे पूर्णपणे जळाले होते. परंतु, मुंडके अर्धवट जळाले होते.

अर्धवट जळालेले मुंडके फेकले गोदावरीत
धडावेगळे केलेले मुंडके व कपडे जाळण्यासाठी शेतात प्रयोग केला. परंतु, सकाळी पाहण्यासाठी गेल्यानंतर मुंडके अर्धवट जळाल्याचे दिसून आले. यामुळे ते अर्धवट जळालेले मुंडके गोदावरी नदीच्या पात्रात टाकून दिले. जेथे मुंडके आणि कपडे जाळून टाकले होते तेथे पाहण्यासाठी गेले असता कपडे पूर्णपणे जळाले होते आणि मुंडके अर्धवट जळाले होते, पण आरोपीने मुंडके घेऊन शहागड येथील गोदावरी नदीच्या पात्रात टाकून दिले.

असा लागला तपास
दोन्ही आरोपींनी स्वतः मृताच्या आई-वडिलांना फोन करून सांगितले की, केशव यास आम्ही बीडवरून बसमध्ये बसवून दिले आहे. मात्र, मृताच्या आई-वडिलांना संशय आला. यानंतर आरोपींनी मावस भावास सांगून ‘केशव हा बारामतीला आला, त्याला वडापाव खाऊ घातला आहे’, असे खोटे बोलण्यासाठी सांगितले. परंतु, केशव घरी न परतल्याने आई-वडील आणि आरोपींनी गोंदी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली हाेती. मात्र, पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत