अनैतिक संबंधाच्या संशयाने पतीचे गुप्तांग कापले

रायगड माझा ऑनलाईन । जालंधर

No automatic alt text available.एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये संशयाचे भूत शिरले की मग तो कोणत्याही थराला जातो याचा प्रत्यय देणारी घटना जालंधरमध्ये घडली आहे. येथील एका महिलेने अनैतिक संबंधाच्या संशयामुळे पतीचे गुप्तांग कापल्याचे समोर आले आहे. गुप्तांग कापल्यानंतर महिलेने ते शौचालयात फ्लश केले. आझाद सिंग असे पतीचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या आझाद यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधरमधील जोगिंदर नगरमधील रविवासी आझाद सिंग यांचे सुखवंत कौर नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांच्या पत्नीला होता. याचा राग मनात धरत महिलेने पती झोपला असताना लोखंडी छन्नीने वार करत बेशुद्ध केले आणि चाकूने गुप्तांग कापले. त्यानंतर शौचालयामध्ये जात पतीचे गुप्तांग फ्लश केले.

दरम्यान, पत्नीच्या अशा कृत्यामुळे जास्त रक्तस्त्राव झालेल्या सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंग यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत