अनैतिक संबंधामुळे तिघींना जाळले; नऊ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

नाशिक : रायगड माझा वृत्त 

येथील पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता सुरेश देवरे (वय ३८) या महिलेचे एका व्‍यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे वाद झाल्यानंतर आई, मुलगी आणि नातीला आईच्या प्रियकराने जाळून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये बालिकेचा जळून मृत्यू झाला. प्रिती रामेश्वर शेंडगे (२०) व तिची मुलगी सिद्धी रामेश्वर शेंडगे आपल्या आईला भेटण्यासाठी दोन दिवसापुर्वी नाशिकमध्ये आल्या होत्‍या. यावेळी मध्यरात्री आईच्या प्रियकराबरोबर आईचा वाद झाल्यानंतर त्याने या तिघांनी जाळण्याचा प्रयत्‍न केला.

या वादानंतर त्या प्रियकराने पहाटेच्या सुमारास बेडवर रॉकेल ओतून आपल्या प्रियेसी आणि तिच्या मुलीला व नातीला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये नऊ महिन्‍याच्या सिद्धीचा जळून मृत्यू झाला आहे, तर संगीता आणि प्रिती या ७० टक्‍क्यापेक्षा अधिक भाजल्या आहेत. जखमींना जिल्‍हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणतील संशयित फरार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत