अन्वय नाईक प्रकरणातून अर्णब गोस्वामींना रोखण्याची शिवसेनेची रणनीती ?

महाराष्ट्र News 24 वृत्त

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुख्यमंत्री याउद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर वरच्या आवाजात टीका करणे पब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना चांगलेच महागात पडणार आहे. मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच केला आहे. आता अन्वय नाईक प्रकरणात लक्ष देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारकडे केली आहे.

मुंबईतील मराठी आर्किटेक्‍ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा २०१८ मध्ये अलिबाग येथे मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एक सुसाईड नोटही घटनास्थळी सापडली होती. रायगड पोलिसांनी याप्रकरणी समाधानकारक कामगिरी न केल्याने  या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश देखील देण्यात आले; परंतु अद्यापही योग्य ती कारवाई झाली नसल्याचे दिसून येत असून नाईक कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नाईक आत्महत्येप्रकरणी करण्यात येत असलेल्या सीआयडी चौकशीची माहिती मिळावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

५ मे २०१८ ला अलिबाग येथे आर्किटेक्‍ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या वतीने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती.  या प्रकरणाची ‘सुसाईड नोट’ पोलिसांना प्राप्त झाली असून या प्रकरणी रितसर गुन्हाही दाखल झालेला आहे. या ‘सुसाईड नोट’ मध्ये अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख असल्याचे बोलले जाते मे महिन्यात अन्वय नाईकच्या पत्नीने व मुलीने या प्रकरणाच्या तपासाबाबत गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी २६ मे २०२० रोजी एक ट्विट करून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सीआयडीने चौकशीचे पुनर्आदेश देण्यात आल्याचे घोषित केले होते.

आता अन्वय नाईक प्रकरणाचा शिवसेना ढाल म्ह्णून तर वापर करीत नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असून याच्या उत्तरासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल हे मात्र नक्की.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत