अपघातग्रस्ताना मदतीला धावले अजित पवार

अजित पवारांची माणूसकी! स्वत:च्या गाडीतून पोहोचवले अपघातग्रस्ताना रुग्णालयात

रायगड माझा वृत्त |

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी अन्न पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. अजित पवार आणि अनिल देशमुख गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास तिरोडा येथे प्रचारसभेला चालले होते. त्यावेळी तिरोडयाच्याआधी चार किलोमीटर अंतरावर बिरसी फाटा नाला येथे एक अपघात झाला होता.

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला इंडिका कारने धडक दिली. या अपघातात एकूण सात जण जखमी झाले होते. अजित पवार यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यांनी आणि अनिल देशमुख यांनी अपघातग्रस्त लोकांना गाडीतून बाहेर काढले व त्यांना स्वतःच्या वाहनातून तिरोडा येथील सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

गोंदिया येथील एका कुटुंबातील भंडारा येथे लग्नाकरिता गेलेले व-हाडी इंडिका कारने भंडाऱ्याहून गोंदियाकडे येत असताना सरांडी गावाजवळील नाल्याच्या वळणावर उभ्या असलेल्या एका ट्रकला इंडिका कार क्रमांक एमएच ३५/पी-१०६८ ने जबरदस्त धडक दिली. या कारमधील पाच व्यक्ती व या कार मागून मोटारसायकलने येणारे दोन व्यक्ती जबर जखमी झाले. मात्र भीषण अपघात होऊनही या जखमींना मदत करण्यास कुणीही पुढे आले नाही.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराकरिता तुमसरकडून तिरोडाकडे येत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व अन्न पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या वाहनांमध्ये जखमींना बसवून उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरिता दाखल केले. यातील दोन व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्वरित उपचाराकरिता गोंदिया रवाना करण्यात आले असून इतरही पाच व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनाही गोंदियाला रवाना करण्यात आले.

या जखमींमध्ये खापर्डे कॉलोनी येथील इंडिका चालक मनिष मेश्राम (२४), यादव बन्सोड, विवेक शेंडे, रवि चौधरी, शुभम ढोमणे सर्व राहणारे खापर्डे कॉलोनी गोंदिया कार्तिक धनराज नरोले, सौरभ रामलाल बाभरे दोन्ही राहणारे चांदोरी  या सर्वांना गोंदियाला रवाना करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत