अपघातात पडलेला २० टनी क्वाईल रस्त्यावरच पडून!

दिघी -माणगांव रस्त्यावर दिघी पोर्ट वाहतूकदारांची दहशत

म्हसळा : निकेश कोकचा 

दिघी -माणगांव  रस्त्यावर दिघी पोर्ट वाहतूकदारांची दहशत वाढतच आहे. आज पहाटे ३ च्या दरम्यान क्वॉईलची वाहतूक करणाऱ्या ट्रेलर मधील सुमारे २० टनी क्रॉईल रस्त्यावर मधोमध कोसळली आणि ट्रेलर कलंडल्याची घटना घडली. या अपघाताची गंभीरता एवढी प्रचंड होती दिवेआगरला जाणारे पर्यटक अवाजाने तोंडसुरे वरुन परत आले, कुणालाही दुखापत नसल्याची विचारून आणि  खात्री करून परत गेले. यामध्ये रस्त्यावर पडलेल्या क्वॉईलचे वजन  आणि गतीमुळे सदरच्या राष्ट्रीय मार्गाचे नुकसान झालेआहे. क्वॉईल पडलेल्या  ट्रेलर क्रं.एम.एच. 14/GD 9906 या वाहनावर म्हसळा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे म्हसळा पोलीसानी सांगितले.
अपघाताची गंभीरता एवढी होती की, शेजारून जाणाऱ्या छोट्या कारवर क्वॉईल पडली असती तर कारचा चेंदा मेंदा झाला असता. आम्ही ट्रेलर जवळून काही अतरावर गेलो व दुदैवी घटना घडली. दिघी पोर्टच्या वहातुकदारांची या रस्त्यावर वहातुकीच्या बाबतीत प्रचंड दहशत आहे. :  सणस, पर्यटक पुणे
सदर ठीकाणी अपघात झाला आहे परंतु कुणाचेही नुकसान व तक्रार नसल्याने गुन्हा नोंदविला नाही.वहा तुकदाराना योग्य ती समज देण्यात आली आहे. : सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक म्हसळा.
अपघात हा अपघातच आहे, त्याची पोलीसानी कर्तव्याने  नोंद करणे क्रमप्राप्त आहे . सदरचा सस्ता हा नव्याने पुणे -माणगाव- दिघी असा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित आहे व त्याचे काम सुरु आहे. या मार्गावरील अनेक  अपघातांची पोलीस नोंद करीत नाहीत त्याची चौकशी व्हावी, अपघाताची नोंद व बांधकाम विभागाकडून त्याचा अभ्यास झाल्याने रस्त्याचे कामात गांभीर्याने सुधारणा होत असते. : महादेव पाटील, माजी सभापती पं.स. म्हसळा
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.