अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५४ लाखांची भरपाई

रायगड माझा वृत्त
ठाणे: अपघात न्यायमंडळाने ठाण्यामध्ये घडलेल्या ट्रक-कार दरम्यानच्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आई व विधवा पत्नीस ५४.१४ लाखांची भरपाई देण्याचा निर्णय दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिलीप पाठक नामक ३५ वर्षीय व्यक्तीचा ६ ऑगस्ट २०११ रोजी शिर्डी देवस्थानाकडे जाताना कल्याण-नगर रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. मृत दिलीप पाठक चारचाकी वाहनातून शिर्डीकडे निघाले असताना त्यांच्या पुढे असलेल्या ट्रक चालकाने आपला ट्रक इंडिकेटर न देता अचानक रस्त्यात थांबवल्याने पाठक प्रवास करीत असलेल्या कार चालकाकडून कार ट्रकच्या मागील बाजूस आदळली गेली.
या अपघातामध्ये चालकाच्या बाजूच्या आसनावर बसलेले पाठक गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. पाठक यांच्या कुटुंबियांकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये ‘ट्रक चालकाच्या हलगर्जीपणा मुळेच अपघात झाल्याचे’ म्हणण्यात आले होते. अपघात न्यायमंडळाचे सदस्य वाघमारे यांनी याबाबत निकाल देताना ‘सदर घटनेबाबतची सर्व तथ्य लक्षात घेता ट्रकचालकाची चुकी असल्याचे सिद्ध होते.’
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत