अपहरणाच्या गुन्ह्यात दोन पोलिस अटकेत

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for arrest

लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन पोलिसांना रविवारी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव आणि कॉन्स्टेबल अविनाश अंधारे अशी त्यांची नावे असून, दोघेही मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत कार्यरत आहेत.

विक्रोळी पार्कसाइट येथे राहणारे हनुमंत कांबळे हे काळाचौकी परिसरात लॉटरीचा स्टॉल चालवितात. शुक्रवारी रात्री रामचंद्र जाधव आणि अविनाश अंधारे पोलिस व्हॅनमधून स्टॉलजवळ आले. तू बेकायदा लॉटरी विकत असल्याने तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, असे धमकी देत दोघांनी दहा हजार रुपये घेतले. हनुमंत याला व्हॅनमध्ये बसवून काही अंतरावर नेले, त्याच्या एटीएममधून आणखी काही पैसे काढले आणि त्याला सोडून दोघे निघून गेले. हनुमंत या याबाबत तक्रार केल्यानंतर काळाचौकी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांना अटक केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत