अफगाणिस्तानच्या 16 वर्षीय खेळाडूने तोडला 28 वर्ष जुना रेकॉर्ड 3350 सामन्यांनंतर घडला पराक्रम

 
(रायगड माझा ऑनलाईन टीम)
 
अफगाणिस्तान क्रिकेट संघातील 19 वर्षीय खेळाडू राशिद खाननंतर संघातील अजून एका खेळाडूंच नाव सध्या चर्चेत आहे. या खेळाडूचं वय आहे फक्त 16 वर्ष. आम्ही सांगत आहोत फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान जदरानबद्दल, ज्याने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अफगाणिस्तान आणि झिम्बॉम्बेदरम्यान झालेल्या सामन्यात आपल्या गोलंदाजदीने मुजीब उर रहमानने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. झिम्बॉम्बेविरोधातील एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात मुजीबने 10 ओव्हर्समध्ये 50 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यासोबतच मुजीब एकदिवसीय सामन्यात सर्वात कमी वयात 5 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
 
मुजीबचं वय सध्या 16 वर्ष 325 दिवस आहे. इतक्या कमी वयात त्याने ही कामगिरी केली आहे. यासोबतच मुजीबने पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वकार युनिसचा 28 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. हा रेकॉर्ड तुटताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना 3350 एकदिवसीय सामन्यांची वाट पहावी लागली.
 
याआधी वकार युनिसने 1990 मध्ये श्रीलंकेविरोधात 18 वर्ष 164 वय असताना पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. हा रेकॉर्ड करणा-यांच्या यादीत तिस-या क्रमांकावर अफगाणिस्तानच्या राशिद खानचं नाव आहे, ज्याने गतवर्षी 18 वर्ष 178 दिवसांचं वय असताना आयर्लंडविरोधातील एकदिवसीय सामन्यात सहा विकेट्स घेतले होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत